Advertisement

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

कन्हान  –  महात्मा ज्योतिबा फुले जयंती समिती व्दारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली.

महात्मा फुले जयंती समारोह समितीच्या वतीने ऑटो व स्कुल बस समितीचे पंकज रामटेके यांचे हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि विन्रम अभिवादन करण्यात आले.

“ विद्ये विना मती गेली। मतिविना नीती गेली।नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले। ” असे प्रखरपणे मांडणारे, स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक, सत्य शोधनाचे प्रणेते, शिवरायांवर पहिला सर्वोत्तम पोवाडा लिहिणारे शिवशाहीर, “ क्रांतिसुर्य महात्मा जोतीबा फुले ” यांच्या जीवन चिरित्र्यावर प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास पंकज रामटेके, प्रमोद चंद्रकाम पुरे, विजय चवरे, नंदु देशभ्रतार, संजय भोवते, शकील भाई, रोशन लोंढे, कृष्णाजी पांडे, सुमेध नितनवरे, कृष्णा दानाघाटे, मनीष नंदेश्वर आदीने प्रामुख्याने उपस्थित राहुन क्रांतिसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या