Advertisement

कचऱ्यात जळला साप, सर्प मित्रांनी उपचार करुन दिले जीवनदान

कचऱ्यात जळला साप, सर्प मित्रांनी उपचार करुन दिले जीवनदान

कन्हान – पारशिवनी तालुक्यातील वराडा गावात एका कचऱ्याच्या ढीग नागरिकांनी जाळला असता आगीत नाग प्रजातीचा साप आढळुन आल्याने नागरिकांनी सर्प मित्रांना बोलावुन त्यावर उपचार करुन जीवनदान देऊन वनविभागा मध्ये सोडुन दिले.

मंगळवार (दि.४) मार्च ला रात्री च्या दरम्यान वराडा गावात नाग प्रजातीचा साप  आढळला होता.

तो साप कचऱ्याच्या ढीगात जाऊन बसला होता. यावेळी गावातल्या लोकांनी तो कचरा जळला असता नाग प्रजातीचा साप आढळुन आला.

सदर घटनेची माहिती लोकांनी सर्प मित्र राम जामकर, निलेश नेवारे यांना फोन करुन दिली असता त्यांनी कुठलाही वेळ न गमवता घटनास्थळी पोहचुन सापाची पाहाणी केली असता साप आगीत जख्मी झाल्याचे दिसुन आल्याने सर्प मित्रांनी वेळोवेळी उपचार करुन जीवनदान देऊन वनविभागा मध्ये सोडुन दिले.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या