Advertisement

उभ्या ट्रक मधुन ३०० लीटर डिझेल चोरी

उभ्या ट्रक मधुन ३०० लीटर डिझेल चोरी

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील डुमरी ईंडीयन पेट्रोल पंप जवळ उभा असलेला ट्रक मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने ३०० लीटर डिझेल चोरुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी देशदिपक यादव यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार (दि.२२) मार्च ला रात्री १२ वाजता च्या दरम्यान फिर्यादी देशदिपक विरपाल यादव  याने आपला ट्रक वाहन क्रमांक एन.एल.०१ एए ०१५८ कंटेनर वाहन हा डुमरी ईंडीयन पेट्रोल पंप जवळ लावुन ट्रक मध्ये झोपला होता. याचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने  ३०० लीटर डिझेल किंमत ३०,००० रुपए  चा मुद्देमाल चोरुन नेला.

सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी देशदिपक यादव यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या