Advertisement

कन्हान येथे आज "एक शाम सलमान अली के नाम" भव्य कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान येथे आज “एक शाम सलमान अली के नाम” भव्य कार्यक्रमाचे आयोजन

मा.श्री आशिष जयस्वाल यांचा वाढदिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

कन्हान – जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था , शिवसेना मित्र परिवार रामटेक विधानसभा क्षेत्र , वर्धराज पिल्ले मित्र परिवार यांचा संयुक्त विद्यमाने रामटेक विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार मा.आशिष जयस्वाल यांच्या वाढदिवसा निमित्य आज सोमवार दिनांक ३ एप्रिल ला सायंकाळी ६:०० वाजता कानपुर केमिकल्स मैदानावर “एक शाम सलमान अली के नाम” भव्य रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

या भव्य कार्यक्रमात सलमान अली व्यतिरिक्त नागपूर ची गायिका गौरी शिंदे आणि नृत्यांगना अंतरा पेदुलवारही आपले कलागुण दाखवणार आहेत. या प्रसंगी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे , रामटेक लोकसभा क्षेत्राचे मा.खासदार कृपाल तुमाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत . यावेळी रामटेक ग्रामीण भागातील सुमारे 300 युवक शिंदे सेनेत प्रवेश करून आमदार आशिष जयस्वाल यांना वाढदिवसाची भेट देणार आहेत . या भव्य रंगारंग कार्यक्रम लाईव्ह शो मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन वर्धराज पिल्ले , निक्कु पिल्ले सह आदि आयोजकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या