Advertisement

युवक काँग्रेस द्वारे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

युवक काँग्रेस द्वारे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहर युवक काँग्रेस आणि महेश धोंगडे मित्र परिवार यांचा संयुक्त विद्यमाने
सत्य शोधक समाजाचे संस्थापक महान विचारक व दलित चिंतक मुलाला एक कपडा कमी घ्या पण शिक्षण दया हा संदेश देणारे महामेरू क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र मुळक जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले.

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस सचिव मा.रोहित नरेश बर्वे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व युवक काँग्रेस पदाधिकार्यांनी व सदस्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी अजय कापसिकर , महेश धोंगडे , सोहेल सैय्यद , सैमरॉन जॉर्ज , दिपक गुप्ता , विश्वजीत गायकवाड़ , शाहनंद शेंडे , सुनिल आंबागडे , सह आदि पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या