धावनी स्पर्धेत कु वैष्णवी कोत्तपल्लीवार ला रजत पदक तर कु.अन्यया मंगर ला कास्य पदक
कन्हान – कोल्हापुरे येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट जुनियर – ग्रुप एथलेटिक्स चैंपियनशिप मध्ये धावनी स्पर्धेत बीकेसीपी शाळेतील कु.वैष्णवी कोत्तपल्ली वार हिने रजत पदक तर कु. अन्यया मंगर हिने कास्य पदक पटकावित कन्हान शहराचे महाराष्ट्रात नाव लौकीक केले.
शिव छत्रपती शिवाजी विश्वविद्यालय सिंथेटिक ट्रैक, कोल्हापुर येथे महाराष्ट्र स्टेट एथलेटिक्स एसोसि एशन व्दारे आयोजित महाराष्ट्र स्टेट जूनियर – ग्रुप एथलेटिक्स चैंपियनशिप मध्ये बीकेसीपी शाळेतील इयत्ता ४ थी ची विद्याथींनी कु.वैष्णवी रविंद्र कोत्तपल्लीवार हिने १० वर्ष मुलीच्या वयोगटात ४ × १०० रिले रेस (धावनी) मध्ये व्दितीय क्रमाक प्राप्त करित, रजत पदक पटकाविले तर
इयत्ता ६ वी ची विद्यार्थींनी कु अन्यया अनिल मंगर हिने १२ वर्ष वयोगटात मुली धावनी २०० स्पर्धेत तृतिय क्रमाक प्राप्त कास्य पदक पटकाविल्याने या दोन्ही मुलीनी स्वतचे , आई वडीलांचे , बीकेसीपी शाळेचे, कन्हान शहराचे सह नागपुर जिल्हयाचे महाराष्ट्रात नाव लौकीक केल्या बद्दल शाळे च्या मुख्याध्यापिका (प्राथ.) जुलियाना राव , मुख्याध्यापिका (प्राथ.) कविता नाथ , क्रिडा शिक्षक अमित ठाकुर सर , क्रिडा शिक्षिका सविता वानखेडे हयांनी कु. वैष्णवी कोत्तपल्लीवार आणि कु. अन्यया मंगर या दोघींचे अभिनंदन करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. तसेच कन्हान-कांद्री शहरातुन या दोन्ही मुली वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या