Advertisement

रामनगर येथे एका ईसमाने गळफास लावुन केली आत्महत्या

रामनगर येथे एका ईसमाने गळफास लावुन केली आत्महत्या : पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत रामनगर येथे मृतक नामे विजय राव वंजारी या ईसमाने राहत्या घरी गळफास लावुन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी धनराज वानखेडे यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी धनराज शंकररावजी वानखेडे वय ३४ वर्ष रा. अजनी (गादा) वार्ड नं.३ पाणी टाकीजवळ कामठी हे परिवारात सर्वात लहान असुन यांचा पेक्षा एक मोठा भाऊ नामे नितीन वानखेडे व दोन बहीणी नामे १) पदमाताई कैलास राऊत , २) शालु बंजारी असा परिवार असुन धनराज यांची लहान बहीण नामे शालु हिचे लग्न मृतक विजयराव वंजारी वर्ष ४२ रा.रामनगर कन्हान यांच्याशी झालेले होते . तसेच धनराज यांची मोठी बहीण सौ.पदमाताई हिचे लग्न कैलास राऊत यांचे सोबत झाले असुन दोन्ही बहिणी चा परिवार आजुबाजुला रामनगर येथे राहत होता . तसेच धनराज यांची लहाण बहीण ही त्यांची मुलगी सुसुंद्री येथील त्यांची भाची यांच्याकडे राहत असल्याने मुलीला बघण्याकरिता मुलाला घेवुन सोमवार दिनांक ३० जानेवारी ला सकाळी ९:०० वाजता गेली होती आणि धनराज यांचे जावई मृतक विजयराव वंजारी हे घरीच होते.

मंगळवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी मृतक विजयराव वंजारी यांच्या राहत्या घराचे दरवाजा बंद दिसल्याने बाजुला राहणारे शेजारी धनराज यांची मोठी बहीण पदमाताई यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु आतून दरवाजा बंद असल्याने उघडता न आल्याने मोठी बहीण पदमाताई राऊत यांनी धनराज यांना फोन करून माहीती दिली की विजयराव वंजारी यांच्या घराचा दरवाजा बंद असुन उघडत नाही आहे . अशा मिळालेल्या माहीतीवरून धनराज हे आपल्या राहते घर अजनी गादा वरून वडील शंकररावजी वानखेडे यांचा सोबत कन्हान येथील बहीणीच्या घरी पोहचले आणि जावई विजयराव वंजारी यांच्या घराची पाहणी केली असता दरवाजा बंद दिसल्याने आवाज दिला परंतु प्रतीसाद न मिळाल्याने धनराज यांनी दरवाज्याला लाथ मारून दरवाजा तोडला असता धनराज यांचे जाली मृतक विजयराव वंजारी हे घरातील तिसर्या रूम मध्ये संडास बाथरूम च्या जवळील वेंटीलेटर खिडकीला गळफास लावून लटकलेले दिसल्याने त्यांनी बाजुला राहणारे चौधरी यांना सदर घटनेबाबत सांगितले व परिसरातील लोकांनी घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली असता पोलीस उप निरीक्षक सुर्यभान जळते हे आपल्या स्टाॅप सह घटनास्थळी पोहचले असता पोलीसांनी सदर घटने बाबत पंचनामा करून गळफास लागलेल्या विजयराव वंजारी यांना ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी रुग्नालय येथे नेण्यात आले असुन बुधवार दिनांक १ फेब्रुवारी ला दुपार च्या दरम्यान नातेवाईकांना शव सौपवुन कन्हान नदी शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले .

सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी धनराज वानखेडे यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला कलम १७४ जा.फौ मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक सुर्यभान जळते हे करीत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या