कांन्द्री येथे मनमोहक झांकी सह विविध कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
शिवशाही ग्रुप कांद्री द्वारे भव्य कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान – कांन्द्री शहर येथे शिवशाही ग्रुप च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली .
रविवार दिनांक १९ फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्य शिवशाही ग्रुप कांद्री च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .
त्यानंतर ढोल ताश्यांचा गजरात , शिवाजी महाराजांची मनमोहक झाकी , आखाडा प्रदर्शन , सुंदर अश्व झाकी , बाल कलाकारांचे शौर्य प्रदर्शन व आपल्या संस्कृतीक वेशभूषेत चिमुकले , महिला भगिनीं आणि शैकडो शिवप्रेमी युवकांचा प्रमुख उपस्थिति मध्यमे परिसरात विविध मार्गाने भ्रमण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी अतुल हजारे , दिनेश राऊत , चेतक पोटभरे , मयूर पोटभरे , लेखराज पोटभरे , गौरव भोयर , लोकेश आंबडकर , मंगेश पारधी , विक्की पारधी , चेतन आखरे , गोलु यादव , जयेश वंजारी , रुपेश सावरकर , दर्शन टीक्कम , मारोती बावणे , महेश खोडे , जॉकी मानकर , चंदन टेकाम , अनिकेत बोधारे , दीपक ढोबळे , पिऊ वंजारी , पूर्वा पारधी , अंकिता पोटभरे , प्रिया पोटभरे , साक्षी पोटभरे , सह आदि शिवप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या