आरोग्य उपकेंद्र बोरडा तर्फे कुष्ठरोग जनजागृती अभियान संपन्न
रामटेक:- आरोग्य उपकेंद्र बोरडा यांच्यातर्फे दिनांक-२-फेब्रुवारी रोजी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी उच्च प्राथमिक शाळा बोरडा यांच्या मदतीने संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावात मिरवणूक काढून नारे देत कुष्ठरोगाबद्दल जनजागृती करण्यात आली.
मिरवणुकीचे समापन शाळेच्या पटांगणात करण्यात आले.त्यावेळी या अभियानांतर्गत पथनाट्याच्या स्वरूपात जनजागृती करण्यात आली.या अभियानाचे मुख्य उद्देश म्हणजे जनसामान्य माणसांना जनजागृती व लोकांची सुरक्षा हे होते. या अभियानात प्रामुख्याने बोरडा येथील आरोग्य सेविका शिल्पा घरडे,आरोग्य सेवक डोंगरे,आशा गतप्रवर्तक छाया दोडके आशा सेविका प्रिया गजबे,पूजा गायकवाड,संगीता लांजेवार,मालती गजबे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक गफ्फार कुरेशी,सहाय्यक शिक्षक लोहकरे सर,तिमासे सर,गावंडे सर,वासाडे सर,बावनकर सर,सौ.यादव मॅडम व शाळेचे विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतिनिधी: पंकज चौधरी रामटेक


0 टिप्पण्या