Advertisement

न्यु गोंडेगाव येथे समर्थ सद्गुरु भाकरे महाराज जयंती दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने थाटात संपन्न

न्यु गोंडेगाव येथे समर्थ सद्गुरु भाकरे महाराज जयंती दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने थाटात संपन्न

कन्हान -परिसरातील न्यु गोंडेगाव येथे मा.मारोती लसुंते यांच्या निवास स्थानी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री समर्थ सद्गुरु भाकरे महाराज यांच्या १०२ वी जयंती दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने थाटात साजरी करण्यात आली.

शनिवार (दि.४) फेब्रुवारी २०२३ ला सायंकाळी ६ वाजता श्री समर्थ सद्गुरु भाकरे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी हरिपाठ व नंतर रात्री ९ वाजता पासुन रात्रभर भजन, कीर्तनाचा कार्यक्रम करण्यात आला.  रविवार (दि.५) फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजता काल्याचे कीर्तन, दहीकाला आणि दुपारी ३ वाजता भव्य महाप्रसाद वितरण करुन दोन दिवसीय कार्यक्र माने श्री समर्थ सद्गुरु भाकरे महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास बहु संख्येने नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य करित कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता विलास लसुंते, सरिता लसुंते व लसुंते मित्र  परिवार आणि समस्थ न्यु गोंडेगाव वासीयांनी केले परिश्रम घेतले.

प्रतिनिधि – ॠषभ बावनकर-कन्हान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या