Advertisement

प्राथमिक शाळा खुमारी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

प्राथमिक शाळा खुमारी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

रामटेक तालुक्यातील नागपूर-जबलपूर महामार्गावरील खुमारी गावातील प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन अतिउत्साहात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनात शालेय विद्यार्थ्यांनी अतिउत्साहाने व हिरीहीरीने भाग घेतले.

वेगवेगळ्या समाजसुधारकांची वेशभूषा साकारत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने सादर करण्यात आले. या वार्षिक स्नेहसम्मेलनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.प्रमोद डुमरे,उपाध्यक्ष दिलीप सरपाते व सदस्य अनिल डुमरे यांच्याहस्ते करण्यात आले.

प्राथमिक शाळा खुमारी येथे प्रथमताच रात्री स्नेहसंमेलन करण्यात आले.यासाठी शाळा व्यवस्थापन समिती यांचे मार्गदर्शन व सहकार्य प्राप्त झाल्याने रात्रीच्या वेळी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी शाळेचे उप-मुख्याध्यापक जगदीश इनवाते यांनी दिली. कार्यक्रमाला सायंकाळी 6 वाजता सुरुवात होऊन रात्री 10 वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा येलपुरे, उप मुख्याध्यापक श्री.जगदीश इनवाते, शिक्षक तुषार कोहपरे, शिक्षिका प्रीती ढवळे, दिव्यांनी राऊत, व गावातील तरुण मंडळी अविनाश चौधरी, विक्की ठवरे, सिद्धार्थ नारनवरे यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात सहकार्य केले.

प्रतिनिधी: पंकज चौधरी, बोरडा-रामटेक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या