आयसर मिनी ट्रक मधुन ७,००० रु. किंमतीची बॅटरी चोरी
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत रामनगर येथे उभ्या आयसर मिनी ट्रक मधुन अज्ञात चोरट्यांने ७,००० रु.किंमतीची बॅटरी चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी रवि महाकाळकर यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून सीसीटीवी फुटेज च्या आधारे पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार (दि.६) फेब्रुवारी ला सायंकाळी ७.३० वाजता रवि चरणदासजी महाकाळकर वय ४२ वर्ष रा. वार्ड क्र.५ रामनगर कन्हान यांनी आपली आयसर मिनी ट्रक क्र. एम एच ४० वाय ८८३५ मध्ये लोखंडी राॅड भरुन घरासमोर उभी करुन ठेवली होती आणि रात्री ला जेवन करुन झोपले. दुसऱ्या दिवशी मंगळवार (दि.७) फेब्रुवारी ला सकाळी ९.३० वाजता रवि महाकाळकर यांच्या गाडी चालक घरी येऊन गाडी चालु करून जाण्याकरिता आला असता गाडी चालु न झल्याने चालक नामे सुशील रमेश इळपाची वय ३८ वर्ष रा. गवलीपुरा यांनी गाडी च्या खाली उतरुन गाडी ला लागलेली बॅटरी बघितली परंतु गाडी ची बॅटरी दिसुन आली नाही.
घटनेची माहिती चालक सुशील यांनी रवि ला दिल्या नंतर रवि यांनी स्वता गाडी जवळ जाऊन बघितले असता गाडी ला बॅटरी दिसुन आली नाही. गाडी ची बॅटरी सोमवार (दि. ६) फेब्रुवारी ला सायंकाळी ७.३० ते मंगळवार (दि.७) फेब्रुवारी ला सकाळी ९.३० वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांने आयसर मिनी ट्रक मधुन ७,००० रू. किंमतीची बॅटरी चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी रवि महाकाळकर यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात सीसीटीवी फुटेज च्या आधारे कन्हान पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
Battery worth Rs 7,000 stolen from Aicer mini truck
icer mini traka madhu 7000 rs kimtiche battary chori
प्रतिनिधि – ॠषभ बावनकर-कन्हान


0 टिप्पण्या