येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी
कन्हान – कन्हान परिसरातील येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे त्यागमूर्ति माता रमाबाई आंबेडकर यांची १२५ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सरपंच कु.सोनु वासुदेव इरपाते यांच्या हस्ते त्यागमूर्ति माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी उपसरपंच धनराज हारोडे यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य , सदस्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी येसंबा ग्रामपंचायत सदस्य सुभाष चकोले , सदस्या रेवती डडुरे , ग्रामसेवक कु.मेघा मेश्राम , माजी उपसरपंच फुलचंद इरपाते , रमेश गजभिये , प्रेमदास मडावी , क्रिष्णा सोनवाणे , ग्रामपंचायत कर्मचारी संजय गजभिये सह आदि नागरिक उपस्थित होते.
प्रतिनिधि – ॠषभ बावनकर-कन्हान


0 टिप्पण्या