शहर विकास मंच द्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटात साजरी
कन्हान-कन्हान शहर विकास मंच द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती शिवाजी नगर येथे विनम्र अभिवादन करुन मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर विकास मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजय असो….! जय भवानी जय शिवाजी चा जयघोष करण्यात आला. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर , हरीओम प्रकाश नारायण , प्रकाश कुर्वे , महेंद्र साबरे , अनुराग महल्ले , कृणाल सिंग राजपुत , अधिकांश कुर्वे , भुषण खंते सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या