आनंदात पार पडला विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा
रामटेक:- जि.प.उच्च प्राथमिक शाळा बोरडा येथे आज दिनांक २ फेब्रुवारी रोजी पालक सभा व बाल आनंद मेळावा अतिउत्साहाने साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना व्यवहारहिशोब याची माहिती व्हावी हे या आनंद मेळाव्याचे प्रमुख उद्देश होते.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत आवडीने या मेळाव्यात भाग घेतले. अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची दुकाने लावली होती. हा संपूर्ण व्यवहार टोकन स्वरूपात चालविण्यात आला. ग्राहकांनी आपल्या जवळील पैसे देऊन टोकन प्राप्त करायची व सामान विकत घ्यायचे होते. यावेळी टोकन घेण्यासाठी अनेक विद्यार्थी तसेच गावातील नागरिकांनी गर्दी केली असल्याचे चित्र होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबन हजारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उमाशंकर सूर्यवंशी, सूर्या डडमल,राजेंद्र नागपुरे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक गफ्फार कुरेशी, शिक्षक बावनकर सर,गावंडे सर,लोहकरे सर,तिमासे सर,वासाडे सर सौ.यादव मॅडम यांच्यासह गावातील अनेक बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी: पंकज चौधरी-रामटेक


0 टिप्पण्या