Advertisement

डुमरी रेल्वे स्टेशन जवळुन दुचाकी वाहन चोरी

डुमरी रेल्वे स्टेशन जवळुन दुचाकी वाहन चोरी

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी रेल्वे स्टेशन जवळील रामकृष्ण मल्ला यांचा घरा समोरुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने दुचाकी वाहन चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी रामकृष्ण मल्ला यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार (दि.२२) फेब्रुवारी ला सायंकाळी ७ वाजता च्या दरम्यान रामकृष्ण सत्यनारायण मल्ला वय २८ वर्ष रा.डुमरी रेल्वे स्टेशन कन्हान हा आपल्या शेतातुन काम करून घरी आला आणि रात्री ला दुचाकी वाहन हिरो होन्डा शाईन क्रमांक एम एच ४०-एए-२४७०, चेसीस नं एमई४जेसी३६केईसी७०२७८० व इंजिन नं जेसी३६१७०८१८४६ हा असुन आपल्या घराच्या दारा समोर उभी करुन रात्री जेवण करून झोपला.

दुसऱ्या दिवशी गुरुवार (दि.२३) ला सकाळी ५ वाजता उठुन बाहेर आला असता रामकृष्ण याला दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४०-एए-२४७० किंमत अंदाजे २५,००० रुपये दिसुन न आल्याने आजु बाजु चा परिसरात पाहणी करुन विचारले असता कोठे ही मिळुन न आल्याने कन्हान पोलीसांनी रामकृष्ण मल्ला यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रमांक ७९२३ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार हरिष सोनभ्रदे हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या