Advertisement

कन्हान पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी

कन्हान पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी

कन्हान – कन्हान रेल्वे स्टेशन रोड वरील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ. नजरा अंसारी , डॉ. सोनम शाहू , डॉ.प्रियांका सोनाळेकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थांना शिक्षणा विषयी माहिती सांगुन सावित्रीबाई फुले यांचा जीवन चिरित्र्यावर मार्गदर्शन केले .

कार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या