रस्ता दुरुस्ती च्या मागणीसाठी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केले आंदोलन
आमडी ते पारशिवनी ते सावनेर रोड वरील गड्डे अपघाता ला आमंत्रण , ५० पेक्षा अधिक लोकांचा झाला मृत्यु
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी शहरातील आमडी फाटा ते पारशिवनी ते सावनेर मार्गाचे सिमेंटीकरण तीन वर्षा पूर्वी करण्यात आले .
पण या रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाल्यामुळे अल्पावधीतच रोडवर गड्डे पडल्याने अपघाताची आकडेवारी दिवसेन दिवस वाढत आहे .आता पर्यंत या रोडावर अनेक अपघात झाले असुन ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यु झाला असुन अनेक लोक अपंगत्व झाले . स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकार्यांना निवेदन देऊन रोड दुरुस्ती करण्याची मागणी केली असता अधिकार्यांनी या कडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या नागरिकांनी ९ जानेवारी ला पारशिवनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते गौरव पनवेलकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात केले .
या दरम्यान आंदोलन कर्त्यांचे निवेदन स्वीकारण्या करिता आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात रोडवरील गड्डे तात्काळ बुजविण्याची , रोडवर दिशा दर्शक फलक लावण्याची , गावालगत कॅटाईज गतिरोधक लावण्याची. पारशिवनी चौकात चारही बाजूंनी कॅटाईज व रंगीत दिशादर्शक लावण्याची , सुरक्षेच्या दृष्टीने रोडवर दिशादर्शक फलक लावण्याची , आणि वाढत्या अपघातावर तात्काळ अंकुश लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .
मागण्या वर तात्काळ अंमलबजावणी न केल्यास नागपूर येथील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसण्याचा ईशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे .
या आंदोलनात सुधाकर मेंघर , डॉ. प्रमोद भड , प्रतिक वैद्य , आदित्य वानखेडे , महेश खुबांळकर , ज्ञानेश्वर मेंघर , अशोक केळवदे , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते


0 टिप्पण्या