Advertisement

कन्हान विकास प्राथमिक शाळेच्या मैदाना वर तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेचे समापन

कन्हान विकास प्राथमिक शाळेच्या मैदाना वर तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेचे समापन

स्पर्धेत सांघिक कबड्डी व लंगडी खेळात धर्मराज प्राथमिक शाळा विजयी

विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी खेळ आवश्यक – शि.वि.अधिकारी लोखंडे

कन्हान  – विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी त्याचा शारीरिक व मानसिक विकास होणे आवश्यक आहे. हा विकास खेळाच्या माध्यमातुन शक्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सौ.कैलास लोखंडे यांनी व्यक्त केले .

नागपुर जिल्ह्य़ात प्रथमच आयोजित खाजगी प्राथमिक शाळांच्या तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धाचे बक्षीस वितरण विकास प्राथमिक शाळेच्या मैदानावर बुधवार (दि.१८) अत्यंत उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा. कैलास लोखंडे , तर प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्र प्रमुख सौ.लता माळोदे , दखने हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.विशाखा ठमके , पर्यवेक्षक ज्ञानप्रकाश यादव उपस्थित होते . सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. क्रिडा स्पर्धेत खाजगी प्राथमिक शाळा वंचित राहत होत्या. प्राथमिकच्या मुलांना मैदानात नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी विदर्भ मुख्याध्यापक संघ नागपुर विभाग शाखा पारशिवनी च्या सर्व मुख्याध्यापकांनी एकत्र येऊन पारशिवनी तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन केल्याने हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मनोगत शिक्षण विस्तार अधिकारी मा.कैलास लोखंडे यांनी व्यक्त केले .

नागपुर जिल्ह्य़ात प्रथमच झालेल्या खाजगी प्राथमिक शाळांच्या क्रिडा स्पर्धेत सांघिक कबड्डी खेळात धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री-कन्हान ला प्रथम विजेते ठरली. तर शिवगीरी हिंदी उच्च प्राथमिक शाळा कोलमाईन्स उपविजेता ठरली. लंगडी सांघिक स्पर्धेत धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री-कन्हान विजेता ठरली. श्री नारायणा विद्यालय हिंदी प्राथमिक शाळा , कन्हान उपविजेता ठरली .१०० मीटर मुलांच्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक राघव शेखर पेटारे (आयडीयल काॅन्व्हेंट) द्वितीय क्रमांक रिशु बिरु नाडे (हिराबाई उच्च प्राथमिक) , तृतीय क्रमांक आरुष अर्जुन गायकवाड (सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक) तर मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पूजा विक्की हातागडे (सावित्री बाई फुले उच्च प्राथमिक) द्वितीय क्रमांक पलक योगेश उईके (श्री शिवगीरी हिंदी उच्च प्राथमिक), तृतीय क्रमांक आरुषी अर्जुन शेंडे (श्री नारायणा विद्यालय हिंदी उच्च प्राथमिक) यांनी प्राप्त केला.

सर्व विजेत्यांचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे संचालन श्री खिमेश बढिये यांनी तर आभार श्री गणेश खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजन अध्यक्ष व मुख्याध्यापक मा.राजेंद्र खंडाईत , उपाध्यक्ष व मुख्याध्यापक सौ. वंदना रामापुरे  सचिव व मुख्याध्यापक मा.खिमेश बढिये , कोषाध्यक्ष व मुख्याध्यापक मा. गणेश खोब्रागडे , मुख्याध्यापक सौ सुनीता देशमुख , मुख्याध्यापक मा.जितेंद्र भांडेकर , मुख्याध्यापक सौ क्रिस्टीना बमजई , मुख्याध्यापक मा.गौरीशंकर साठवणे , मुख्याध्यापक सौ.रोजमेरी माडा स्वामी यांच्यासह मा.अभिषेक यादव , मा.अमित मेंघरे , मा.देवेंद्र सेंगर , मा. भिमराव शिंदे मेश्राम , कु.शारदा समरीत ,मा. शशिकांत बोंद्रे , कु हर्षकला चौधरी , मा. सचिन कनोजिया , आबुल हसन , सैय्यद मतीन , सौ मिरा राय , उदयवीर सिंग , मंगला पाहुणे , वनीता घोडेस्वार , हेमंत वंजारी , अभिषेक मोहनकर , भास्कर सातपुते , आयशा अंसारी , सौ.जया पवार , नरेश तेलकंपीवार , प्रशांत वैद्य , सौ. लता पेटकर , सौ रुपाली उके , कु प्रांजल डोकरीमारे , सौ सुरेखा अवचट , सौ मंगला बावनकुळे , शरद डोकरीमारे , रविकांत गेडाम , सौ.अभिलाषा कावळे , सुनील पवार यांनी आयोजनात व स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या