Advertisement

कन्हान तारसा चौकात भाजपा द्वारे पाकिस्तान विरोधात आंदोलन

कन्हान तारसा चौकात भाजपा द्वारे पाकिस्तान विरोधात आंदोलन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचा बद्दल पाकिस्तान चे विदेश मंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी ‘अपमानजनक’ टिप्पणी केल्याने कन्हान तारसा चौक येथे भाजपा पदाधिकार्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार निर्दशने करुन निषेध आंदोलन करण्यात आले .

पाकिस्तान चे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो जरदारी यांनी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका करताना त्यांचा उल्लेख ‘गुजरातचा कसाई’ असा करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना संबोधल्याने भाजपा पदाधिकार्यांचा आणि मोदी समर्थकांच्या भावना दुखवल्याने भाजपा पारशिवनी तालुका आणि कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या नेतृत्वात तारसा चौक येथे पाकिस्तान विरोधात जोरदार प्रदर्शन करुन परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो जरदारी यांचा पुतळ्याला जोडे चप्पल मारुन पुतळा जाळुन तीव्र निषेध आंदोलन करण्यात आला .

या प्रसंगी तुलेषा नानवटकर , कामेश्वर शर्मा , महेंद्र चव्हान , नारायण गजभिए , रिंकेश चवरे , संजय रंगारी , विक्की सोलंकी , गुरुदेव चकोले , सचिन वासनिक , दिपनकर गजभिये , रवि महाकाळकर , शैलेश शेळके , महेंद्र साबरे , संदिप कभे , सुनिल आगुटलेवार , अजय लोंढे , मनोज कुरडकर , ऋषभ बावनकर , राजेंद्र हटवार , हर्ष पाटील , आकाश वाडणकर , लोकेश आंबाळकर , मारोती बावणे सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या