सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व कन्हान व्यापरी संघटने च्या ठिय्या आंदोलना ला मिळाले यश
2 डिसेंबर ला नगर परिषद येथे विशेष सभा घेणार – नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा विक्री झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती , कन्हान व्यापारी संघटना , सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांच्या पुढाकाराने बुधवार ला कन्हान – पिपरी नगर परिषद कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
हिंदूस्थान लिव्हर लि. कंपनी ची १८.५ एकर जागा ग्रोमर वेंचर द्वारे खरेदी करण्यात आल्याने वातावरण चांगले तापले आहे . कन्हान शहराच्या सार्वजनिक मुलभुत गर्जा पूर्ण करण्यासाठी भुखंडाची आवश्यक आहे . या मागणी करिता कन्हान परिसरातील विविध राजकीय , संघटने च्या पदाधिकार्यांनी व सदस्यांनी अनेकदा निवेदन देऊन नगर परिषद ला विशेष सभा घेण्याचे व ठराव पारीत करण्याचे विनंती करण्यात आली होती . परंतु नगर परिषद प्रशासना ने या विषयावर विशेष सभा घेतली नाही . तसेच नगर परिषद च्या 16 सदस्यांनी पत्र देऊन विशेष सभा घेण्याची मागणी करुण ही विशेष सभा बोलवीण्यात आली नाही . त्यामुळे बुधवार 30 नोव्हेंबर ला 16 नगर परिषद च्या सदस्यांनी माजी आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांचा नेतृत्वात जिल्हाधिकारी मा.डाॅ. विपिन इटनकर यांचा कडे विशेष सभा बोलावण्यासाठी निवेदन सादर केले . या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी नगरसेवक राजेंद्र शेंदरे , मनिष भिवगडे , विनय यादव , सौ.सुषमा चोपकर , सौ.अनिता पाटिल , राजेश यादव , कल्पना नितनवरे , विनय यादव , सौ.गुम्फा तिड़के , पुष्पा कावड़कर , सौ. संगीता खोब्रागडे , सौ.वंदना कुरडकर , कु.रेखा टोहने , सौ. वर्षा लोंढे , सौ. मोनीका पौनिकर , डायनल शेंडे उपस्थित होते .
त्यानंतर दुपारी 12.00 वाजता कन्हान नगर परिषद कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले . या आंदोलनाच्या माध्यमातून नगराध्यक्ष सौ.करुणाताई आष्टणकर यांना विशेष सभा घेण्यास बाध्य करण्यात आले असुन या ठिय्या आंदोलनात स्वता नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर व मुख्याधिकारी यांनी 02 डिसेंबर रोजी विशेष सभा घेण्यात येईल असे जाहिर केले असुन या विशेष सभे च्या ठरावा द्वारे हिंदुस्तान लिव्हर ची कंपनीची संपूर्ण जागा नगरा च्या सार्वजनिक मुलभुत विकासासाठी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव पारित करण्याचे मान्य केले .
तसेच गुरुवार दिनांक.24 नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन प्रस्ताव कन्हान विकास आरखडा रद्द करण्याचे मान्य केले असुन कन्हान नगराचा विकास आरखडा हिंदूस्तान लिव्हर लि. च्या संपूर्ण 18.5 एकर जागेवर प्रस्तावित करण्याचे मान्य केले व सर्व नगर परिषद सदस्यांनी एक मताने ठराव पारित करण्याचे मान्य केले .
या ठिय्या आंदोलना मध्ये कन्हान – कांद्री दुकानदार महासंघाचे अध्यक्ष अकरम कुरैशी , सचिव प्रशांत मसार , स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षीय नेते नरेश बर्वे , राजेश यादव , योगेश वाड़ीभस्में , उदयसिंह यादव , रमेश कारेमोरे , विजय हटवार , महेंद्र भूरे , विनोद किरपान , सतीस भसारकर , चिंटू वाकुळकर , ज्ञानेश्वर दारोडे , सौरभ यादव , अखिलेश मेश्राम , कामेश्वर शर्मा , अभिजीत चांदुकर , विक्की जीभकाटे , मो.सफीक शेख , फिरोज शेख , सौ.आशाताई पनिकर , सौ.पुर्णिमा दुबे , हर्षाली नागपुरे , मिनाताई कळंबे , प्रतिक्षा चवरे , प्रशिक सुखदेवे , रवि महाकाळकर , शैलेश कडबे , प्रणय बावनकुळे , ऋषभ बावनकर , प्रभाकर रुंघे , आकाश पंडितकर , प्रशिक सुखदेव , मयुर माटे , सुरेश कळंबे , सचिन वासनिक , शरद वाटकर , अजय लोंढे , मनोज कुरडकर , दीपंकर गजभिये , छोटू राणे , अजय चव्हाण सह आदि नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते . इतर गावांतील नागरिक व सामाजिक कार्यकते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या ठीय्या आंदोलनाच्या यशस्वीते करिता लिलाधर बर्वे , रिंकेश चवरे , शैलेश शेळके , राजेश पोटभरे , विक्की जीभकाटे , सुरेंद्र चवरे , नीलकंठ मस्के , चिराल वैध , प्रशांत पाटील आदि ने अथक परिश्रम घेतले .


0 टिप्पण्या