Advertisement

आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ यांची सनराईज मेडिकलच्या तालुकाध्यक्षपदी निवड

आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ यांची सनराईज मेडिकलच्या तालुकाध्यक्षपदी निवड

वडगाव मावळ मावळ तालुका सनराईज मेडिकल फाउंडेशनच्या तालुकाध्यक्षपदी नवलाख उंबरे गावचे माजी सरपंच दत्तात्रय पडवळ यांची निवड करण्यात आली. फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष रोशन मराठे यांनी निवड जाहीर केली.
सनराईज मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू व गोरगरिब रूग्णांना किडनी, यकृत प्रत्यारोपण, कॅन्सरवरील शस्त्रक्रिया,लहान मुलांच्या हृदयामध्ये छिद्रासंदर्भातील शस्त्रक्रिया तसेच दुर्धर आजारांवरील उपचार मोफत केले जाणार आहे. यापूर्वीही दत्तात्रय पडवळ यांच्या माध्यमातून विविध समाजसेवा करत असतात. गरजु व्यक्तींना मदत हवी असल्यास पडवळ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या