Advertisement

कन्हान - पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर माजी आमदार रेड्डी यांच्या नेतृत्वात साखळी उपोषणा ला सुरुवात

कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर माजी आमदार रेड्डी यांच्या नेतृत्वात साखळी उपोषणा ला सुरुवात

पहिल्या दिवशी १२५ पेक्षा जास्त लोकांनी साखळी उपोषणाला भेट दिली

समाजिक युवा संघटने ने केले समर्थन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान -कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लीवर लीमिटेड ची संपूर्ण 18.78 एकड़ जागा ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आल्याने शहराच्या सर्वांगीण विकास कार्य आणि मुलभुत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटने च्या वतीने गुरुवार दिनांक २२ डिसेंबर पासुन रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात कन्हान – पिपरी नगर परिषद कार्यालय समोर साख़ळी उपोषण सुरू करण्यात आले आहे .

सर्व प्रथम आंबेडकर चौक येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला पुष्प हार माल्यार्पण करुन साखळी उपोषणा ला सुरवात करण्यात आली . पहिल्या दिवशी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी ,भाजपा अनुसूचित जाति मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष लीलाधरजी बर्वे , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , भाजपा अनुसूचित जाति मोर्चा नागपुर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे , तालुका महामंत्री मयूर माटे , या पाच लोकांन व्दारे साखळी उपोषण करण्यात आले . या साखळी उपोषणा च्या पहिल्या दिवशी विविध पक्षाचा , संघटने च्या १२५ पेक्षा जास्त लोकांनी उपोषण स्थळाला भेट देऊन समर्थन दिले आहे .

हे साखळी उपोषण २२ डिसेंबर पासून ते ३० डिसेंबर २०२२ पर्यंत चालणार असून दर दिवशी वेगवेगळे पक्ष व संघटना प्रतिनिधित्व करणर आहेत. ही चळवळ सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटनाच्या वतीने चालविण्यात येत आहे . या चळवळीच्या माध्यमातून सर्व पक्षाच्या नेत्यांना व जनप्रतिनिधिना आह्वान करण्यात आले की, त्यांनी या चळवळीत सहभागी होऊन कन्हानच्या नागरिकांच्या हितासाठी ही मागणी पूर्ण करण्यास सरकारला बाध्य करावे . जो पर्यंत मागणी पुर्ण होत नाही तो पर्यंत हे चळवळ सुरू ठेवण्याचे समितिचा निर्धार आहे . उषोषणा ला पहिल्या दिवशी सामाजिक युवा संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष विक्की जीभकाटे , उपाध्यक्ष विनोद किरपान यांच्या द्वारे या साखळी उपोषणा ला समर्थन पत्र मा.माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी साहेब याना देण्यात आले.

आज शुक्रवार (दि 23) डिसेंबर ला कांग्रेस पक्षाचे वतीने उपोषण करण्यात येणार आहे . असे 30 डिसेंबर पर्यंत सर्व पक्षाचे व सर्व संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या