कन्हान ला भाजपा द्वारे पुर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेई यांची जयंती थाटात साजरी
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भाजपा कन्हान शहर द्वारे देशाचे पुर्व पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय स्व.अटल बिहारी वाजपेई यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन रामभाऊ दिवटे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले होते .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेई यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , महामंत्री सुनिल लाडेकर यांनी अटल बिहारी वाजपेई यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी अटल बिहारी वाजपेई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी सुनील लाडेकर , कामेश्वर शर्मा , संजय रंगारी , राजेंद्र शेंदरे , अजय लोंढे , मनोज कुरडकर , विक्की सोलंकी , रविंद्र महाकाळकर , नारायण गजभिये , महेंद्र चौहान , दिपंकर गजभिये , सुरेश कळंबे , दिनेश नानवटकर , उपासराव खोब्रागडे , भरत साळवे , स्वप्निल आगाशे , मोती हरोडे , हर्ष पाटील , तुलेशा नानवटकर , सुषमा चोपकर , सुनंदा दिवटे , मीनाताई कळंबे समर्थांना देशभ्रतार सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते


0 टिप्पण्या