कन्हान शहर विकास मंच द्वारे पुर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेई यांची जयंती थाटात साजरी
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे देशाचे पुर्व पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय स्व.अटल बिहारी वाजपेई यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले होते .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कन्हान शहर विकास मंच चे नवनिर्वाचित सदस्य नरेश शेळके यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेई यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर यांनी अटल बिहारी वाजपेई यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी अटल बिहारी वाजपेई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रणय बावनकुळे , भरत सावळे , प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर , नरेश शेळके , अंकुश शेंडे सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते


0 टिप्पण्या