Advertisement

हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची संपूर्ण जागा शहराच्या सार्वजनिक मुलभुत गर्जा पूर्ण करण्यासाठी आवश्यक - माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी

हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची संपूर्ण जागा शहराच्या सार्वजनिक मुलभुत गर्जा पूर्ण करण्यासाठी आवश्यक – माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी

कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर 22 डिसेंबर पासुन साखळी उपोषण

पत्रकार परिषदेत माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांची माहिती

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जमीन विक्री झाल्याने शहराच्या विकासा वर आणि मुलभुत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व कन्हान – कांद्री दुकानदार महासंघ यांचा वतीने गुरुवार दिनांक 22 डिसेंबर पासुन तर 30 डिसेंबर पर्यंत कन्हान – पिपरी नगर परिषद कार्यालय समोर साखळी उपोषण आरंभ करण्यात येत असल्याची माहिती माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी चरडे भवन येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषद मध्ये दिली .

मागील कित्येक वर्षापासुन अनेक राजकीय आणि विविध सामाजिक संघटने च्या पदाधिकार्यांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन हिंदुस्तान लिव्हर कंपनी च्या जमीनी वर मार्केट यार्ड, हाॅकर्स झोन, साप्ताहिक व गुजरी बाजार, भाजीपाला विक्रेता दुकानदार, बस स्टैंड आणि शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता उपयोगात घेण्याची मागणी केली होती . परंतु नगर परिषद प्रशासनाने सदर विषया कडे गंभीर्याने लक्ष केंन्द्रीत न केल्याने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जमीन विकण्यात आली .

यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासा वर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील कित्येक वर्षापासुन शहरात रिकामी जागा नसल्याने राष्ट्रीय चारपदरी महा मार्गावर फुटपाथ, गुजरी आणि साप्ताहिक बाजार भरत असल्याने नागरिकांना व दुकानदाराना जिव मुठीत घेऊन सामानाची खरेदी विक्री करावी लागत आहे. यास्तव विविध संघटने द्वारे अनेकदा नगर परिषद प्रशासना ला निवेदन देऊन ही प्रशासन झोपेतुन जागा न झाल्याने आज हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा बाहेरील काही लोकांना विकण्यात आल्याने शहरातील सर्वांगीण विकासा वर आणि मुलभुत सुविधा वर आता प्रश्न निर्माण झाले आहे .

कन्हान शहराच्या सार्वजनिक मुलभुत गर्जा पूर्ण करण्यासाठी भुखंडाची आवश्यक आहे . या करिता राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना कन्हान शहरातील स्थानिक नागरिक , दुकानदार , शिक्षक , डाॅक्टर्स , सामाजिक कार्यकर्ते , आणि विविध क्षेत्रात काम कार्य करणाऱ्या तमाम जनते तुन 10,000 पोस्ट कार्ड पाठविण्यात येणार आहे . अशी माहिती माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली .

या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी , नगरसेविका रेखा टोहणे , गुंफा तिडके , कन्हान – कांद्री दुकानदार महासंघ अध्यक्ष अकरम कुरैशी , किशोर बेलसरे लिलाधर बर्वे , रिंकेश चवरे , विनोद किरपान , शैलेश शेळके , संजय रंगारी , चिराल वैध , प्रशांत पाटील , प्रदीप गायकवाड , मनोज काकडे , मयुर माटे , अभिजीत चांदुरकर , सह आदि दुकानदार , सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या