Advertisement

पारशिवनी तालुक्यात 21 ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये मतदान संपन्न

पारशिवनी तालुक्यात 21 ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये मतदान संपन्न

7 ठिकाणी सरपंच पदासाठी थेट स्पर्धा , पोलीसांचा तगडा बंदोबस्त

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी तालुक्यातील
21 ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शुक्रवार ला संपला . आज रविवार दिनांक 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे . या मध्ये खंडाळा (डुमरी), वाघोडा, करंभड, पारडी, डुमरी (काळा), खंडाळा (मर्यांबी) आणि दहेगाव (जोशी) येथे सरपंचपदासाठी थेट लढत होणार आहे . टेकाडी (खाण), निलज, बावरी, पालोरा, नयाकुंड, तामसवाडी येथे तिरंगी लढत होणार आहे. नांदगाव, बोर्डा (गणेशी), सालई (मोकासा), जुनी कामठी, सालई (माहुली), मेहंदी मध्ये 4-4, साटक मध्ये 5 आणि गोंडेगाव मध्ये सर्वाधिक 7 उमेदवार रिंगणात आहेत .

21 ग्रामपंचायत मध्ये सदस्यांच्या 177 जागांसाठी 431 उमेदवार रिंगणात आहेत . पारशिवनी तालुक्यातील सर्वात मोठी १७ सदस्य असलेली टेकाडी (खदान) ग्रामपंचायत मध्ये 58 उमेदवार रिंगणात आहेत . जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सभापती , उपसभापती , सदस्यांसह सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रयत्नशील आहेत.

आज होणाऱ्या मतदान केंद्र येथे शांती सुव्यवस्था कायम राखण्या करिता पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या