केरडी शिवारात आढळला ६ फूटाचा लांब ब्राउन कोब्रा नाग
सर्प मित्रांनी रेस्क्यू करुन जंगलात सोडुन दिले जिवनदान
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील केरडी शिवारात एक ६ फूटाचा लांब ब्राउन कोब्रा नाग आढळुन आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली असुन तेथील नागरिकांनी सर्प मित्रांना फोन करुन बोलविले असता सर्पमित्रांनी ब्राऊन क्रोबा नागाला रेक्यु करुन जंगलात सोडुन जिवनदान दिले .
कन्हान शहरा पासून नऊ किमी अंतरावर असलेल्या केरडी शिवारात निक्कम न्यु बिल्डिंग च्या जवळ बनत असलेल्या हॉल मध्ये ०६ फूट लांबीचा ब्राउन कोब्रा नाग (Indian spectacled cobra) बुधवार ला रात्री च्या सुमारास मिळुन आल्याने परिसरात एकच घाबरगुंडी उडाली होती . या दरम्यान तेथील राहणाऱ्या नागरिकांनी कन्हान येथील सर्प मित्र अविनाश पासपेलकर , राजकुमार बावने ,राम जामकर , कृणाल देऊळकर यांना फोन करुन सुचना दिली असता त्यांनी घटनास्थळ गाठुन ६ फूट लांबीचा ब्राउन कोब्रा नागाला (Indian spectacled cobra) रेस्क्यु करुन आपल्या ताब्यात घेऊन सुरक्षित वन विभागाचा साह्याने जंगलात सोडुन जिवनदान दिले .


0 टिप्पण्या