Advertisement

भाजपा द्वारे संविधान दिवस थाटात साजरा

भाजपा द्वारे संविधान दिवस थाटात साजरा

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – भाजपा अनु:सुचित कन्हान शहर द्वारे संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात केली . यावेळी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना वर प्रकाश टाकुन उपस्थितांना मार्गदर्शन केले . त्यानंतर संविधानाचे वाचन करण्यात आले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संविधान दिवस साजरा करण्यात आला .
या प्रसंगी नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका सुषमा चोपकर , वर्षा लोंढे , तुलेषा नानवटकर , सुनिल लाडेकर , संजय रंगारी , अमोल साकोरे , महेंद्र चव्हान अजय लोंढे , रिंकेश चवरे , शैलेश शैळके , मयुर माटे , दिपनकर गजभिये , माधव वैद्य सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या