कन्हान शहर विकास मंच द्वारे संविधान दिवस थाटात साजरा
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे 26 नोव्हेंबर संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक ताराचंद निंबाळकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात केली . यावेळी मंच मार्गदर्शक ताराचंद निंबाळकर , प्रभाकर रुंघे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान दिवस वर उपस्थितांना मार्गदर्शन केले . त्यानंतर संविधानाचे वाचन करण्यात आले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी व सदस्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , सहसचिव प्रकाश कुर्वे , कोषाध्यक्ष प्रणय बावनकुळे , हरीओम प्रकाश नारायण , शाहरुख खान , अनुराग महल्ले , कृणाल सिंग राजपुत , अश्विन भिवगडे , सोनु खोब्रागडे , राजेंद्र हटवार , योगराज आकरे सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या