Advertisement

कन्हान ला दिंडी यात्रा काढुन कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात थाटात साजरी

कन्हान ला दिंडी यात्रा काढुन कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात थाटात साजरी

नागरिकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात केली पुजा अर्चना

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कार्तिकी एकादशी निमित्य शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नागरिकांनी विधिवत पूजा अर्चना करून परिसरात दिंडी यात्रा काढुन आणि विविध कार्यक्रम सादर करुन कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली .

शुक्रवार दि.४ नोव्हेंबर ला कार्तिकी एकादशी निमित्य छत्रपती शिवाजी नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सकाळी ६ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जेष्ठ नागरिक मुलचंद शिंदेकर , जयरामजी तिडके , हरीभाऊ तडसे , विनायकजी भिलकर , रवि सिंग सोलंकी आदि महिलांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी देवीची विधिवत पूजा अर्चना करून मंदिर पासुन दिंडी यात्रा काढण्यात आली . दिंडी यात्रेत भगवानजी कावळे यांनी ढोलक आणि महिलांनी ताळ वाजवत दिंडी यात्रा परिसरातील विविध मार्गाने भ्रमण करुन दिंडी यात्रेचे मंदिरात समापन करण्यात आले . त्यानंतर मंदिरात फराळ , चाहा , पाणी वितरण करण्यात आले असुन सायंकाळी महिलांनी मंदिरात भजन कीर्तन , आरती आणि विविध कार्यक्रम सादर करुन कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमाचे आयोजन अनुराग महल्ले , कृणाल सिंग राजपुत यांनी केले.
या प्रसंगी परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या