Advertisement

कन्हान पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बैठक संपन्न

कन्हान पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बैठक संपन्न

दक्षता जनजागृती सप्ताह निमित्याने बैठकीचे आयोजन

भ्रष्टाचाराला मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा – पोलीस अधिकार्यांचे नागरिकांना आव्हान

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दक्षता जनजागृती सप्ताह निमित्याने बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकी मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना आपल्या मार्गदर्शनातुन भ्रष्टाचाराला मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करण्याचे आव्हाहन केले आहे .

बुधवार दि २ नोव्हेंबर ला कन्हान पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या अध्यक्षतेखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर यांच्या दक्षता जनजागृती सप्ताह निमित्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपधिक्षक सौ.योगीता चाफले , पोलीस निरीक्षक आशिष चौधरी , पोलीस निरीक्षक सारंग मिराशी , व इतर पोलीस अधिकारी , कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .

या बैठकी मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
उप अधिक्षक सौ.योगीता चाफले यांनी नागरिकांना माहिती दिली कि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग असुन भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे. शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित असुन जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आव्हान उपधिक्षक योगीता चाफले यांनी नागरिकांना केले आहे .

तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक आशिष चौधरी यांनी आश्वासन दिले कि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल व भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती , समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल. हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल .

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांनी मार्गदर्शना तुन समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करण्याचे आव्हाहन केले आहे .या प्रसंगी कन्हान पोलीस स्टेशन चे क्राईम पोलीस निरीक्षक यशवंत कदय , दयाराम राऊत , प्रशांत मसार , ऋषभ बावनकर , प्रणय बावनकुळे , सुतेश मारबते , पुंडलीक कुरडकर , गुंडेराव चकोले , श्रीकृष्ण मारोतराव , पुरुषोत्तम दोळके , संदिप नेऊल , चंदन मेश्राम , पंकज गजभिए , सह आदि गावातील पोलीस पाटील , सामाजिक कार्यकर्ते , व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या