कन्हान पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालक दिन म्हणुन थाटात साजरी
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरातील रेल्वे स्टेशन रोड वरील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १४७ वी जयंती बालक दिन म्हणुन थाटात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. माणिक आसटकर आणि प्रमुख अतिथि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा.सचिन बनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.माणिक आसटकर आणि प्रमुख अतिथि मा.सचिन बनकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीवन चिरित्र्यावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शिक्षक , शिक्षिकांनी आणि विद्यार्थांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती बालक दिन म्हणुन थाटात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाची प्रस्ताविक व सुत्र संचालन सौ पुष्पा कोल्हे यांनी केले तर आभार आशिष सायरे यांनी केले .
कार्यक्रमात सर्व शिक्षक , शिक्षिका आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते .


0 टिप्पण्या