येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणुन थाटात साजरी
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १४७ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सरपंच धनराज हारोडे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले . यावेळी गावातील बालगोपाळांना शालेय स्टेशनरी,चाॅकलेट वापट करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणुन थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी अंगणवाडी सेविका मायाताई चकोले,मदतनिस कांताताई गजभिये,कुमारजी गडे,गणेशजी बांगडे,अभिनय गडे,आणि बालगोपाल प्रामुख्याने उपस्थित होते .


0 टिप्पण्या