कांद्री ला अवैधरित्या कोंबडे लढाई जुगार अड्यावर कन्हान पोलीसांची धाड
दोन कोंबडे व नगदी असे १९७० रूपयाचा मुद्देमाल जप्त , दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल .
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्रमांक ३ निरंजन परिसरात सुरू असलेल्या कोंबडे लढाई च्या जुगार अड्यावर कन्हान पोलीसांनी धाड मारून दोन आरोपींना पकडुन त्यांचा जवळुन दोन कोंबडे १००० रू नगदी ९७० रू. असे १९७० रूपयाचा मुद्दे माल जप्त करुन पोस्टे ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.६) नोव्हेंबर ला दुपारी ३ ते ३.३० वाजता दरम्यान कन्हान पोलीस हद्दीत कन्हान पोलीस पेट्रोलिंग करित असतांना गुप्त माहिती मिळाली की, कांद्री वार्ड क्र.३ परिसरात कोंबडे लढाई वर जुगार सुरू आहे. अश्या विश्वसनिय माहिती वरून कन्हान पोलीसांनी घटनास्थळी जावुन पाहिले असता तिथे अवैधरित्या दोन कोंबड्याचा पाया ला लोखंडी काथी बांधुन झुंज लावुन कोंबड्या च्या लढाई वर पैसे लावुन हारजीत चा जुगार खेळतांनी मिळुन आल्याने पोलीसांनी आरोपी १) जयराम भिम राव गायकवाड राह. सत्रापुर कन्हान, २) प्रमोद रमेश हरेद राह.कांद्री कन्हान या दोन आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा जवळुन नगदी ९७० रूपये, एक काळ्या लाल रंगाचा कोंबडा ५०० रूपये व एक लाल पांढऱ्या रंगाचा कोंबडा ५०० रूपये असा एकुण १९७० रूपया चा मुद्देमाल जप्त करून सरकार तर्फे फिर्यादी पोलीस शिपाई सुशिल मोरेश्वर तट्टे यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला दोन आरोपी विरुद्ध कलम १२, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पो.ना प्रशांत रंगारी हे पुढील तपास करीत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या