Advertisement

कन्हान ला स्वर्ग श्री बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली

कन्हान ला स्वर्ग श्री बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान गांधी चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे द्वारे हिंदुहृदयसम्राट स्वर्ग श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित रामटेक विधानसभा संघटक प्रेम रोडेकर यांच्या हस्ते व युवासेना शहर प्रमुख समीर मसराम , शिवसेना शहर प्रमुख यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये स्वर्ग श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी प्रेम रोडेकर , प्रभाकर बावने यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन चिरित्र्यावर प्रकाश टाकुन उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत पुण्यतिथि आदरांजली वाहुन साजरी केली .

या प्रसंगी समीर मसराम(युवासेना शहर प्रमुख) , प्रभाकर बावणे (शिवसेना शहर प्रमुख) , सावन लोंढे (वाहतुकेसना शहर प्रमुख) , मेहर इंचुरकर (वाहतुकसेना उपशहर प्रमुख) , प्रेम रोडेकर ( रामटेक विधानसभा संघटक ) डायनल शेंडे ( नप माजी. उपाध्यक्ष , नगरसेवक ) , मोनिकाताई पौनीकर ( नगरसेविका) , गनेश मस्के ( तालुका संघटक शिवसेना) , महेंद्र भुरे ( मा.तालुका प्रमुख शिवसेना ) , उमेश पौनीकर , विनोद पात्रे , राजन मनगटे , प्रकाश पात्रे , पुषोत्तम येणेकर , निकेश शेंडे , सुशील पात्रे ,रुपेश सातपुते , सावन हातागडे , नरेंद्र खडसे , सह आदि शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या