Advertisement

राज्यस्तरीय सावित्रीज्योती पुरस्कार -2022 ने युवा समाजसेविका कुमारी पूनम कुथे सन्मानित

“राज्यस्तरीय सावित्रीज्योती पुरस्कार -2022” ने युवा समाजसेविका कुमारी.पूनम कुथे सन्मानित

मागील सात वर्षांपासून पूर्व विदर्भातील विविध जिल्ह्यात लहान- मोठ्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इत्यादी समाजहिताच्या उपक्रमात सहभागी होऊन, अनेक सामाजिक संघटनेसोबत मिळून समाजकार्य करित असलेल्या ब्रम्हपुरी येथील कुमारी.पूनम नानाजी कुथे यांना उत्कृष्ठ उल्लेखनीय समाजकार्यासाठी दिनांक 30/10/2022 रोजी रविवारला नाशिक येथे झालेल्या निर्वान फाउंडेशन मार्फत आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात सुंदरसा सन्मानपत्र, गोल्डन ट्रॉफी, मानाचा फेटा देऊन “राज्यस्तरीय सावित्रीज्योती सन्मान -2022” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सदर पुरस्कार सोहळ्याला, निर्वान फाउंडेशनचे संस्थापक निलेश आंबेडकर, पश्चिम आफ्रिका येथील समाजसेवक किट्यानो दजता, ग्रेबियल सिल्वा, सिने अभिनेता प्रशांत गरुड, अभिनेत्री पल्लवी पटवर्धन आणि नाशिक जिल्हा क्षयरोग अधिकारी एम.बी. देशमुख, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यात राज्यातून निवडक 50 लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या