online Apps च्या माध्यमातून ई-पिक नोंदणी करिता शेतकऱ्यांची आमडी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरपंच सौ शुभांगी भोस्कर यांचा अध्यक्षतेत सभा संपन्न
आमडी/पारशिवनी:- दिनांक ११/१०/२०२२ ला आमडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच सौ शुभांगी राजू भोस्कर यांचा अध्यक्षते मध्ये सभा घेण्यात आली होती. या सभे मध्ये ई-पिक नोंदणी शेतकर्यांनी स्वता चा मोबाईल मधुन ई-पिक नोंदणी Apps द्वारे, नोंदणी कशी करायची याबाबद माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण देतांना प्रामुख्यानी उपस्तीथ मंडळ अधिकारी जगदने यांनी Apps द्वारे शेतकरी स्वता चा शेतातील पिकांची नोंदणी करणे, गरजेच आहे समजावून सांगितले. शेतकर्यांना ई-पिक नोंदणी स्वतः करणे गरजेचे आहे त्यामागचे कारण शेतकरी बांधवांना व उपस्थित नागरिकांना आवर्जून समजावून सांगितले. पिक पाहणी मुदत १५ ऑक्टोंबर २०२२ पर्यत आहे. तरी ई-पिक पाहण्याकरिता ७/१२ चा पेरा करून घेण्याचे आव्हान सरपंच सौ शुभांगी राजू भोस्कर यांनी केले आहे.
शेतकर्यांचे ई शेतपिक नोंदणी मुळे होणारे फायदे.
१) शेतकर्यांचा शेतीमध्ये किती एकरा मध्ये कोणते पिक आहे हे ई-पिक नोंदनी ऑनलाईन माहिती मिळाल्या मुळे तलाठी /पटवारी शेतकर्यांचा ७/१२वर ऑनलाईन नोंद करेल.
२)शेतकर्यांना शेतीवर (क्रॉप-लोन ) कर्ज घेते वेळी ७/१२वर पिकांची नोंद राहणे आवशक आसते.
३) शेतीमध्ये झालेल्या नुक्सान भरपाईत ७/१२वर पिकांची नोंद असल्याने शासनाला नुकसान भरपाई निशचीत करता येते.
शेतकऱ्यांनि शेतपिकांचे ई-पिक नोंदणी न केल्याने होणारे नुकसान वर भरपाई करिता वरील कोणतेही लाभ मिळनार नाही. अशी शासनाची ताकीद असल्यानी तातडीची सभा बोलून शेतकरी बांधवांना ई-पिक विषये माहिती सादर करून online Apps द्वारे ई-पिक फॉर्म भरून घेतले.
जान्हीतात कार्य मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आमडी-हिवरी ग्रामपंचायत सरपंच सौ शुभांगी राजू भोस्कर यांनी आमडी-हिवरी गावातील शेतकर्यांना ई-पिक नोंदणी Apps द्वारे स्वता चा शेतातील पिकांची नोंदणी करण्याची विनंती ह्या वेळी केली.


0 टिप्पण्या