Advertisement

दानदात्या सुमनबाई पोटभरे यांचा सुनिल केदार च्या हस्ते सत्कार

दानदात्या सुमनबाई पोटभरे यांचा सुनिल केदार च्या हस्ते सत्कार

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कांद्री येथील रहिवासी श्रीमती सुमनबाई विश्वनाथजी पोटभरे यांनी ग्रा पं. कांद्री च्या नवीन ईमारत बांधकामाकरिता जागा अपुरी पडत असल्याने आपली खाजगी २,८८० स्के.फुट जागा ही ग्रामपंचायत कांद्री ला दान दिल्याने त्यांचा नागरी सत्कार माजी मंत्री मा.सुनील केदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

कांद्री ग्रामपंचायत च्या नविन इमारत बांधकामा करिता जागा अपुरी पडत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मागणी वरून कांद्री च्या जेष्ठ नागरिक श्रीमती सुमनबाई विश्वनाथजी पोटभरे यांनी आपली खाजगी २,८८० स्के. फुट जागा ही ग्रामपंचायत कांद्री ला दान दिल्याने सुस्वज्य नविन ग्रामपंचायत इमारतीचे निर्माण झाल्याने त्यांचा नागरी सत्कार माजी मंत्री मा.सुनील केदार यांच्या शुभ हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मी बर्वे ,माजी मंत्री राजेंद्र मुळक , पंचायत समिति सभापती सौ.मीनाताई कावळे , कांद्री ग्रामपंचायत बलवंत पडोळे , उपसरपंच श्यामकुमार ऊर्फ बबलु बर्वे , आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संमारंभा सह सत्कार करण्यात आला. या अगोदर सुद्धा त्यांचे पती स्व.विश्वनाथजी पोटभरे यांनी सुद्धा गावाला पिण्याच्या पाण्याचा सोयीकरिता पाण्याच्या टाकीकरिता आपली खाजगी जागा कांद्री ग्रामपंचायत ला दान स्वरूपात दिली होती. स्व.विश्वनाथजी पोटभरे यांचा पाऊलावर पाऊल टाकीत त्यांचा धर्म पत्नी यांनी सुद्धा आता कांद्री ग्रामपंचायत ला जागा दान दिल्याने त्यांचा भव्य नागरी सत्कार कांद्री ग्रामपंचायत व्दारे करण्यात आला .

या प्रसंगी प्रामुख्याने कांद्री ग्रामपंचायत सदस्य धनराज कारेमोरे , बैसाकु जनबंधु , प्रकाश चाफले , शिवाजी चकोले , चंद्रशेखर बावनकुळे , महेश झोडावाने , राहुल टेकाम , आशाताई कनोजे , दुर्गाताई सरोदे , वर्षाताई सिंगणे , सिंधुताई वाघमारे , मोनाली वरले , अरूणा हजारे , वर्षा खडसे , विभा पोटभरे , अरूणा पोहरकर , आदिं च्या प्रमुख उपस्थिति मध्ये श्रीमती सुमनबाई पोटभरे यांनी त्यांचा मुलगा श्री.भुपेंद्रजी पोटभरे यांचे सह उपस्थित राहुन हा सत्कार गावकऱ्यांच्या उपस्थित स्विकार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या