शिवाजी नगर कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व शिवशक्ती रास गरबा द्वारे गरबा संपन्न
शिवाजी नगर कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व शिवशक्ती रास गरबा द्वारे तीन दिवसीय रास गरबा कार्यक्रम संपन्न

कन्हान: शिवाजी नगर कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व शिवशक्ती रास गरबा यांच्या सयुक्त विध्य्माने भव्य रास गरबाचे गुरुवारला प्रथम दिनी कन्हान नगर च्या नगर अध्यक्षा सौ करुणा आष्टनकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून माता राणी ची आरती व राष्ट्र गीतांनी कर्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

रास गरबा मध्ये मोठ्या प्रमाणात मुले, मुली व महिलांनी सहभाग घेतला. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारल रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांनी आपली उपस्थिती दर्शविली, तसेच श्री वर्धराज पिल्ले ह्यावेळे प्रामुख्यानी कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच कलर्स मराठी channel वरील मालिका “सूर नवा ध्यास नवा” या माधीत गायन स्पर्धेचे प्रथम विजेता उत्कर्ष वानखेडे यांनी सुद्धा कर्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. सर्व मान्यवरांचे समिती द्वारे स्वागत करण्यात आले.
तसेच
आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते उत्कर्ष वानखेडे यांना पुष्प गुच्छा, शाल व श्रीफळ देऊन स्वगत सत्कार करण्यात आला. तसेच गरबाच्या कर्यक्रमाला सुरुवत करून कलर्स मराठी मधील गायन स्पर्धा जिंकणारे उत्कर्ष वानखेडे यांनी गीत गाऊन आपल्या स्वरांनी सर्वंना मंत्रमुग्ध केले. तसेच कार्यक्रमाचे समापन नंतर सर्व स्पर्धकांना समिती द्वारे आकर्षक उपहार देण्यात आले. तसेच कर्यक्रम यशस्वी करण्याकरिता माझी नगर सेवक अनिल ठाकरे,छोटू राणे,प्रदीप गायकवाड,अजय चव्हाण, हरीश तिडके ,सचिन सहारे,निलेश चवरे, उमेश अकोने,आश्विन बाणते,नरेंद्र ठाकरे,शुभम येलमुले ,चेतन खेरडे, योगेश उरकुडे,प्रवीण तिवारी, शिवजी नगर मित्र परिवार आणि शिवशक्ती रास गरबा समूह ने अथक परिश्रम केले.


0 टिप्पण्या