Advertisement

व्यापारी संघाच्या वतिने भव्य ऑक्रैस्टा कार्यक्रम उत्साहात साजरा

व्यापारी संघाच्या वतिने भव्य ऑक्रैस्टा कार्यक्रम उत्साहात साजरा

नागभिड :-दसरा उत्सवाच्या निमित्ताने नागभिड व्यापारी संघाच्या वतिने 16 ऑक्टोबर रोजी जनता विद्यालयाचे पटांगणात ऑर्केस्ट्रा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भागंडीया यांनी उपस्थिती दर्शविली. सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यापारी संघ आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांचे आगमना प्रित्यर्थ हार्दिक स्वागत व विशेष सत्कार केला. दरम्यान, आमदार भांगडीया यांनी उपस्थित नागभीड करांना विविध विषयांवर संबोधित केले.

यावेळी प्रामुख्याने मंचावर भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रड़के, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजुरकर, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पल्लीवार, कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठान, माजी न.प. उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, माजी न.प. बांधकाम सभापती सचिन आकूलवार, अमीर धम्मानी, व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धम्मानी, माजी व्यापारी संघाचे अध्यक्ष हनीफ भाई ज्यादा, सचिव विजय काबरा, माजी नगरसेवक न.प. चिमूर सतीश जाधव, हेमंत नन्नावरे व्यापारी संघाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या