Advertisement

वाघाच्या हल्यात सत्यवान मेश्राम शेरकी ठार

वाघाच्या हल्यात सत्यवान मेश्राम शेरकी ठार

नागभीड :-नागभीड तालुक्यातील पान्होळी या गावातील शेळ्या राखणाऱ्या ईसमावर वाघाने हल्ला केल्याने ठार झाला. मृतकाचे नाव सत्यवान मेश्राम वय ६५ वर्षे आहे. तो नेहमी प्रमाने जंगला शेजारी शेळ्या चारायचा आज नेहमी प्रमाणे शेळ्या चरायला गेला असता म्हसली बीट अंतर्गत येत असलेल्या कंपार्टमेट नंबर ६६९ या परीसरात वाघाने हल्ला केला त्यात त्यांचा मृत्यू झाला. मृतकाला एक मुलगा आणी दोन मुली असुन ते विवाहीत आहेत. वन विभागा कडुन तातडीची मदत म्हणून मृतकाच्या कुंटुबीयांना २५ हजार रुपयाची मदत करण्यात आली. यावळी नागभिड वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे, क्षेत्र सहाय्यक अजय नेलरवार, तावाडे, बिट सहाय्यक गितेश खोबरागडे उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या