जुनी कामठी येथे शिवा मेश्राम यांच्या शेतात एका इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या
फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत जुनी कामठी येथे शिवा मेश्राम यांच्या शेतात गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरवार दि.२७ आॅक्टोंबर ला दुपारी ३०० ते ३३० वाजता च्या दरम्यान फिर्यादी रघुनाथ झिंगुजी छानिकर वय ६० वर्ष राहणार जुनी कामठी , कन्हान हे शिवा मेश्राम यांच्या शेतातुन परत येत असता शिवा मेश्राम यांच्या शेतातील रिठाच्या झाडाला एक इसम फासी लागलेल्या अवस्थेत दिसला असुन जवळ जाऊन पाहिले असता तो रघुनाथ छानिकर यांच्या मुलगा मृतक प्रफुल रघुनाथ छानिकर वय २८ वर्ष रा जुनी कामठी , कन्हान हा होता . रघुनाथ छानिकर यांच्या मुलगा मृतक प्रफुल छानिकर हा दारु पिण्याचा सट्टापट्टी व पत्ते खेळण्याचा सवईचा होता. मृतक प्रफुल छानिकर याचा वर पत्याचे सट्याचे कर्ज होता त्याचे पैसे देऊ शकला नाही म्हणून प्रफुल छानिकर ह्याने शिवा मेश्राम यांच्या शेतात रिठाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली .
सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक विलास काळे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेले असता शवविच्छेदना नंतर मृतदेह रघुनाथ छानिकर यांना सौपवुन नदी घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले .
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी रघुनाथ छानिकर यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला कलम १७४ जा.फौ अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .


0 टिप्पण्या