टेकाडी येथे नवरात्र महोत्सव निमित्य नवनिर्मित शारदा माता मंदिर निर्माण करुन केली शारदा मुर्तिची स्थापना
विविध कार्यक्रमाने नवरात्र महोत्सव थाटात संपन्न
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरातील टेकाडी गावात नवरात्र महोत्सव निमित्य नवनिर्मित शारदा माता मंदिर निर्माण करुन मंदिरात विधिवत पूजा अर्चना शारदा मुर्तिची स्थापना करुन विविध कार्यक्रमाने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात संपन्न करण्यात आले .
टेकाडी गाव येथील सुभाष चौक परिसरात मागील १०० वर्षापासुन शारदा मातीच्या मुर्तीची स्थापना करुन नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत होते. परंतु या वर्षी एक नवीन रुप देण्यात आले असुन १०० वर्ष ज्या जागेवर शारदा मातीच्या मुर्तीची स्थापना करुन नवरात्र महोत्सव साजरा करण्यात आले होते त्या जागेवर नवनिर्मित शारदा मातेच्या भव्य दिव्य मंदिर निर्माण करुन घटस्थापने च्या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मी बर्वे यांच्या हस्ते आणि पंचायत समिति सदस्या करुना ताई भोवते यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मंदिराचे उद्घाटन करुन विधिवत पूजा अर्चना करून शारदा मुर्तीची स्थापना करुन नवरात्र महोत्सवाची सुरवात करण्यात आली होती . त्यानंतर नऊ दिवस रोज सकाळ सायंकाळ आरती करण्यात आली असुन भजन कीर्तन , संस्कृतिक कार्यक्रम , गरबा नृत्य , सह विविध कार्यक्रम राबविण्यात आले . आठव्या दिवशी महाप्रसाद वितरण करुन नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात संपन्न करण्यात आले .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शारदा माता मंदिर समिति प्रमुख प्रकाश गोले , नागोरावजी सहारे , अनिल नानवटकर , मनोज लेकुरवाडे , कमलाकर बोराडे , विशाधर मोहाडे , जयदेव सातपैसे , मोतिराम सातपैसे , बलिराम सातपैसे ,नत्थूजी मोहाडे , सुधाकर राउलकर , प्रविन होले , सौरभ नाकतोडे , निलेश गाडवे , निखिल मरघडे ,सुरेंद्र राऊत , सदस्या सौ मंगला गोले , वंदना सातपैसे , शुभांगी लेकुरवाडे , बोरघरे ताई , कान्ता गुरधे , मनोज बोराडे , कमलाकर राउत , भावेश गोले , रमेश बालपान्डे , महादेव भोयर , यश निमकर , सह आदि नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .


0 टिप्पण्या