ब्रम्हपुरी येथे नाभिक युवा आघाडी तर्फे संत श्री नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन
ब्रम्हपुरी येथील सर्व सलुन दुकान बंद राहतील
नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी च्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नगाजी महाराज यांची 256 वी पुण्यतिथी कार्यक्रमा निमित्त ब्रम्हपुरी येथील सर्व रुग्णालयात रुग्णसेवा , रक्तदान शिबिर, बाइक रॅली-शोभायात्रा, सन 2021-22 च्या इयत्ता 10वी आणि 12 वी च्या नाभिक समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 11आक्टोंबर श्री संत नगाजी महाराज देवस्थान कहाली खंडाळा रोड ब्रम्हपुरी येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.हिरालाल मेश्राम प्राचार्य मनोहर कामडी कॉलेज नागपूर, असुन उपाध्यक्ष स्थानी दिलीप ढोक उपविभागीय जलसंधारण अधिकारी जि.प.लघु पाटबंधारे विभाग भद्रावती , तर दिपप्रज्वलन मा.केशवराव सुर्यवंशी से.नि. शिक्षणाधिकारी ब्रम्हपुरी यांच्या हस्ते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. धनराज खानोरकर ने.हि.महाविद्यालय ब्रम्हपुरी,.प्रा. मोहन कापगते ने.हि. महाविद्यालय ब्रम्हपुरी,मा.अमरजी ठाकरे सर से.नि.मुख्याधापक निरूपा विद्यालय रुई ,प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हपुरी येथील नाभिक समाजाचे सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी आदिंची उपस्थिती राहणार आहे.
प्रस्तुत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी चे अध्यक्ष लक्ष्मीकांत फुलबांधे सलुन असोसिएशन ब्रम्हपुरी चे अध्यक्ष सुरज कुंडले नाभिक महिला आघाडीच्या अध्यक्षा रजनी ताई सुर्यवंशी व पदाधिकारी सदस्य गण यांनी केले.


0 टिप्पण्या