कन्हान येथे ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात साजरा
कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली . यावेळी संस्थेचे सहसचिव प्रकाश कुर्वे , कोषाध्यक्ष प्रणय बावनकुळे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी व सदस्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , कोषाध्यक्ष प्रणय बावनकुळे , अश्विन भिवगडे , हरीओम प्रकाश नारायण , अनुराग महल्ले , अंकुश शेंडे सह आदि मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते .


0 टिप्पण्या