Advertisement

शिवाजी बचत गटाने तयार केली धानावरील किडिवर व तुरतुड्यावरील सेंद्रिय औषध

शिवाजी बचत गटाने तयार केली  धानावरील किडिवर व तुरतुड्यावरील सेंद्रिय औषध

धान या पिकाची शेती करताना अनेक रोगाचा प्रादुर्भाव होत असतो त्यामध्ये किडी आणि तुडतुडा याचाही समावेश असतो  या रोगावर नियंत्रणाकरिता शेतकरी रसायनिक औषधांचा फार मोठ्या प्रमाणात वापर करत असतात.

मात्र पाहिजे तेवढा फायदा शेतकऱ्यांना होत नाही व यामध्ये त्यांची आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होत असते. यावर उपाययोजना म्हणून ब्रह्मपुरी शहरापासून ३ किलोमीटर अंतरावरील झिलबोडी येथील छत्रपती शिवाजी शेतकरी बचत गटाने धान किडीवरील तसेच तुडतुडा या रोगावर हमखास काम करत असणारी औषध तयार केलेली आहे.  ही सेंद्रिय औषधी फक्त तीस रुपये लिटर प्रमाणे विशाल धोटे, झीलबोडी यांचे घरी शेतकऱ्यांकरिता उपलब्ध करण्यात आलेली असून  परिसरातील शेतकरी बांधवांनी या सेंद्रिय औषधीचा जास्तीत जास्त उपयोग करावा अशी विनंती गटाचे अध्यक्ष सुखदेव प्रधान सर यांनी केलेली आहे. सदर औषध चहांदे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली असून औषध तयार करण्याकरिता बंडू नाकतोडे, शंकर भानारकर , मोरेश्वर भुते,  गजानन भुते , मदन भुते , जगदीश ढोरे,  उषा भुते , लिलाबाई नाकतोडे या सर्व बचत गटांच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या