गोंडेगाव वस्ती येथुन दुचाकी वाहन अज्ञात चोरट्यांने केले चोरी
फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गोंडेगाव काॅलोनी वस्ती येथुन रोड च्या कडेला लावलेली दुचाकी वाहन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार दिनांक २६ आॅक्टोंबर ला दुपारी १२:३० वाजता च्या दरम्यान डब्लु सी एल गोंडेगाव कॉलनी वरुन फिर्यादी सत्यविर उपेन्द्र सिंग वय ३७ वर्ष रा.गोंडेगाव कॉलनी कन्हान हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम ४० बी झेड ५४८८ ने कन्हान कडे येत असता गोंडेगाव वस्ती जवळ सत्यविर यांची दुचाकी वाहन अचानक बंद पडली असुन ती चालु होत नसल्याने सत्यविर यांनी आपली दुचाकी वाहना चा हॅन्डल लॉक करुन रोड च्या कडेला लावुन मॅकेनिकल आनण्यास कन्हान येथे आला असता आणि अरध्या तासांनी परत मँकिनिकल घेऊन गेला असता सत्यविर यांची दुचाकी वाहन क्रमांक एम ४० बी झेड ५४८८ ब्लॅक सिलव्हर रंगाची हिरो कंपनीची ज्याचा चेचीस नंबर एचए११ईवहीएल५एल००३६३५सीओ८१४३ किंमत 50,000/- रु. ची दिसुन आली नाही. सत्यविर यांनी दुचाकी वाहना चा शोध आजुबाजुच्या परिसरात घेतला असुन गावातील लोकांना विचारपुस केली असता मिळुन न आल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी सत्यविर सिंग यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .


0 टिप्पण्या