Advertisement

कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात दिवाळी महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरा

कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात दिवाळी महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरा

शिवाजी नगर येथे युवकांनी केले 107 दिवे प्रज्वलित

कन्हान – देशातील सर्वात मोठा सण दिवाळी उत्सव गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे नागरिकांना उत्साहात साजरा करण्यात आला नाही . मात्र या वर्षी कोरोना च्या प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने शासनाने निर्बंध हटविल्याने शहरात आणि ग्रामीण भागात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . दिवाळी उत्सव निमित्त नागरिकांनी नवीन कपडे , फटाके व इतर वस्तूंची जोरदार खरेदी केली . दिवाळी लक्ष्मीपुजन च्या दिवशी नागरिकांनी आपल्या घरोघरी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा अर्चना करून फटाके फोडुन आनंद उत्सव साजरा केला.

शहरात दिवाळी निमित्त मंदिरां मध्ये भाविकांची मोठी गर्दी होती . या दिवाळी उत्सव निमित्त शिवाजी नगर येथे शिवाजी स्मारक समोर कन्हान शहर विकास मंच सदस्य अनुराग महल्ले , कृणाल राजपुत , अनिल ठाकरे , हरिष छिड़के आदि महिलांनी 107 दिवे प्रज्वलित करून भाविकांनी दिवाळी निमित्त पूजा केली.  त्याचवेळी दिव्यांच्या रोषणाईने शिवाजी नगर परिसर उजळून निघाले आणि हे दृश्य आकर्षणाचे केंद्र ठरले .

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या