Advertisement

कन्हान येथे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची ९१वी जयंती वाचन प्रेरणा दिनाने थाटात साजरी

कन्हान येथे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची ९१वी जयंती वाचन प्रेरणा दिनाने थाटात साजरी

प्रत्येकांनी किमान अर्धा तास वाचन केले पाहिजे वासुदेव चिकटे यांचे आव्हान

सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान हनुमान नगर येथे सार्वजनिक वाचनालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची ९१ वी जयंती ‘वाचन प्रेरणा दिना ‘ ने थाटात साजरी करण्यात आली.

शनिवार दि.१५ ऑक्टोंबर ला सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे वाचनालयाचे अध्यक्ष वासुदेव चिकटे , प्रमुख अतिथी प्रकाश नाईक (सेवानिवृत अभियता) यांच्या हस्ते देशाचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मा.दिनकर मस्के , गंगाधर अवचट , सुभाष घोगले , स्वप्लिन वकलकर , रवि राणे , कु प्रियंका तांबे , सौ अल्का कोल्हे , धनजोडे गुरुजी सह आदि ने डॉ.कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत अशा सच्च्या देशभक्ताच अनुसरण प्रत्येक भारतीयांनी केले पाहिजे . अशी अपेक्षा व्यक्त केली . त्यानंतर बोलतांना वाचनालयाचे अध्यक्ष वासुदेव चिकटे यांनी या वाचन प्रेरणा दिनी प्रत्येकांनी किमान अर्धा तास वाचन केले पाहिजे असे आवाहन केले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन वाचनालयाचे संचालक सचिव मनोहर कोल्हे यांनी केले . तर आभार ग्रंथपाल श्याम बारई यांनी व्यक्त केले .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक वाचनालया चे नितिन मोहने , राहुल पारधी , अधिकार चौहान , विक्की कनोजे , चेतन ठाकरे सह आदि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन सहकार्य केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या